मंगलवार, 22 दिसंबर 2009

ज्योतिष्यांची  जादू


काही ज्योतिषी अपली ज्योतिष  कला वापरुन आपन कोणत्या समस्ये मध्ये आहात हे चट्कन सांगतात. आपण मनातला
 प्रश्नच सांगीतला म्हणजे हा भविष्य पण सहजच सांगेल हा चमत्कारी पुरुष वाटतोय असा काही जण विचार करु
 लागतात.हा काही चमत्कार नसतो प्रश्न कुडलीच्या माध्यमातुन हे सहज शक्य आहे.
 हे एक  ग्रह-गणित आहे प्रश्न-कुण्डली बनऊन त्या प्रश्न-कुण्डली मध्ये स्थित ग्रहांचा विचार केला की हे सहज
समजते.त्यासाठी लग्न कुंडली मांडता आली पाहीजे जी एकदम सोप्पी आहे.एकदा का प्रश्न विचारायला आलेल्या वेळेला जर
 लग्न कुंडली बनऊन त्यात ग्रहांची मांडणी केली की त्यानुसार सदर व्यक्तीला मनत काय चालू आहे, काय चिंता कींवा प्रश्न
 आहे  हे सांगता येतं

सूर्य व चंद्र  प्रश्न कुंडली मध्ये ज्या भावात आसेल त्या भावात कोणती चिंता असेल ते प्रतीत करतो.

 सूर्य  प्रश्न कुंडली मध्ये ज्या भावात आसेल त्या भावात कोणती चिंता असेल ते प्रतीत करतो.

सूर्य  भावा मध्ये  असता कोणी कपट वा त्रास किंवा कोणी बदनामी करत असण्या संबधीत चिंता दाखवतो.
२ रा भाव जे कार्य हाती घेतले आहे त्यात लागणारे धन-पैसा, बल किंवा बाहु बल वा सफलता संबधीत चिंता दाखवतो.
३ रा भाव कोणी भांडण करतोय.
४ था भाव कोणाचा तरी द्वेष करताय.
५ वा भाव  संतत्ती,शिक्षण,खेळातील यश-अपयश या संबधीत चिंता दाखवतो.
६ वा भाव रस्त्याने जाता येता जे काम करण्याचे राहून गेले आहे त्याची चिंता.
७ वा भाव जीवन साथी किंवा भागीदार अहंकाराने वागतो.
८ वा भाव  ह्रदयरोग वा नोकर द्वारा काम न करणे.
९ वा भाव परदेशी राहाणार्‍या व्यक्तीची चिंता
१० वा भाव  राज्य वा सरकार पोलीस यंत्रणा त्रास देत आहे.
११ वा भाव  सरकार कडुन वा पुत्र किंवा पिता यांच्या धन-पैसा यांची चिंता.
१२ वा भाव येण्या-जाण्याचा रस्ता व शत्रु कडुन त्रास


चन्द्र प्रश्न कुंडली मध्ये ज्या भावात आसेल त्या भावात कोणती चिंता असेल ते प्रतीत करतो.


चन्द्र  भावा मध्ये  रहात्या घरा संबधीत चिंता दाखवतो.
२ रा भाव  धन परिवार काम  विदेशात व्यक्ति यांच्या चिंता.
३ रा भाव  घरा पासुन दूर राहाण्या ची व  धार्मिक कामाचे प्रयोजन करण्याची चिंता.
४ था भाव करियर व घर अथवा आई किंवा पाणी ,
५ वा भाव संत्तती अथवा लवकर पैसा बनवण्याची चिंता
६ वा भाव प्रयत्न करुनही यश न मिळणे वा असफ़लता,
७ वा भाव जीवन साथी वा भागीदार यांनी केलेल्या कपट इ. मुळे चिंता
८ वा भाव लॉटरी  पॉलिसी इ. मार्फत फूकटचे धन व वडिलां कडचा वारसा हक्काची संपत्ती.
९ वा भाव लांबचे प्रवास वा कोणी केलेल्या कपटा मुळे कायदेशीर सहाय्य न मिळणे.
१० वा भाव कोणी तरी दिलेला शब्द फिरवला आहे.
११ वा भाव  मित्रां कडुन फसवणूक
१२ वा भाव  चोरी होणे व हरवणे.